खेड : साखरोलीत मानवी हाडे आढळल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू

banner 468x60

खेड तालुक्यातील साखरोली गावाच्या हद्दीत रविवारी (दि. २१ जून) सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास मानवी अवशेष आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. साखरोली पेट्रोल पंपाच्या पुढील वळणाजवळ ही धक्कादायक बाब उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मानवी हाडे ताब्यात घेतली. त्यानंतर पंचनामा करून अवशेष पुढील तपासणीसाठी कळबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, सापडलेले अवशेष स्त्रीचे आहेत की पुरुषाचे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच या घटनेमागे घातपात, अपघात किंवा आत्महत्येचा कोणता प्रकार आहे का, याबाबतही अद्याप स्पष्टता आलेली नाही.

दरम्यान, पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडे चौकशी सुरू केली असून अवशेषांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे साखरोलीसह परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *