Breaking News
दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त रत्नागिरी : भरधाव ॲक्टिव्हाची महिलेला जोरदार धडक, गंभीर जखमी करून चालक पसार गुहागर : ग्रामदेवतेच्या मंदिरातून 32 हजारांचे दोन अॅम्प्लिफायर चोरीला राजापूर : दिवसा घरफोडी, कुलूप तोडून 12 हजारांचे चांदीचे साहित्य लंपास

दापोली : करजगावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, सामाजिक संस्थांचा शिक्षणाला हातभार

banner 468x60

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी करजगाव येथील व्ही. के. जोशी हायस्कूलमध्ये शनिवारी (दि. २० जून) शालेय साहित्य वितरणाचा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ‘आय के एस हेल्थ’, ‘सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई’ आणि ‘श्रीराम बलवर्धक मंडळ, जालगाव’ यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना दप्तरांसह विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शालेय दप्तर आणि साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद विशेष लक्षवेधी ठरला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच कठोर परिश्रम, शिस्त आणि जिद्दीचे महत्त्व पटवून दिले. शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. समाजातील विविध संस्था विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पुढाकार घेत असल्याबद्दल आयोजक संस्थांचेही कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाला. सौरभ बोडस,. अमर पावसे, शालेय समितीचे चेअरमन. राजनजी सनकुळकर, संस्थेच्या सदस्य श्रीमती अपर्णाताई बागकर,. असदुल्ला हुसैनी तसेच शाळेचे मुख्याध्यापक. एस. आर. जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. सतीश कोकणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन. बारस्कर यांनी मानले. अखेरीस उपस्थितांनी सामूहिकरीत्या ‘पसायदान’ म्हणत कार्यक्रमाची सांगता केली. शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *