खेड तालुक्यातील कळबणी उपजिल्हा रुग्णालयात निकृष्ट दर्जाच्या औषधांचा पुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. दिवाणखवटी येथील कैलास यादव यांनी रुग्णालयातून देण्यात आलेल्या रक्त पातळ करणाऱ्या औषधांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करत संबंधित प्रकरणाची तक्रार केली आहे.

यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातून मिळालेल्या औषधांचा अपेक्षित परिणाम होत नसल्याने त्यांनी या औषधांच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली. रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांवरील उपचारांमध्ये औषधांची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची असताना अशा प्रकारचे आरोप समोर आल्याने रुग्णांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

या संदर्भात रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित औषधांचा दर्जा तपासून सत्यस्थिती समोर आणावी, अशी मागणी होत आहे.
रुग्णांच्या जीवाशी थेट संबंधित असलेल्या या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच औषध खरेदी, पुरवठा आणि गुणवत्ता नियंत्रण प्रक्रियेचीही तपासणी करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या गंभीर आरोपांबाबत कळबणी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाची भूमिका काय असेल आणि तक्रारीवर कोणती कार्यवाही केली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













