रत्नागिरी : अंमली पदार्थ सेवन करताना तरुणाला पकडले, एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

banner 468x60

रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस रोड परिसरात अंमली पदार्थाचे सेवन करताना एका तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


banner 728x90

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १७ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.२० वाजण्याच्या सुमारास थिबा पॅलेस रोड, ता. जि. रत्नागिरी येथे कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल वैभव गजानन मोरे (वय ३९) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

या कारवाईदरम्यान अदनान शफीक फणसोपकर (वय ३०, रा. कर्ला, मशिदीजवळ, ता. जि. रत्नागिरी) हा अंमली पदार्थ सेवनासाठी वापरण्यात येणारे साहित्य स्वतःजवळ बाळगून त्याचा वापर करताना आढळून आला.

पोलिसांनी त्याच्याकडून एक अर्धवट जळालेला फॉईल पेपर आणि हिरव्या रंगाचे वापरलेले लाईटर असा मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची एकूण किंमत १० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २००/२०२६ नुसार अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस अॅक्ट १९८५) कलम ८(क) व २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *