दापोली : नॅशनल हायस्कूल मांदिवलीत प्रवेशोत्सव उत्साहात, विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

banner 468x60

मांदिवली येथील दि यंग पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई यांच्या व्यवस्थापनाखालील नॅशनल हायस्कूल, मांदिवली येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नव्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमात आनंदी आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी फैजान मुकादम यांच्या कुरआन पठणाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक फैयाज होते. इयत्ता आठवीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुस्तके व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. तसेच माजी शिक्षण विस्तार अधिकारी नजीर अली वलेले यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट भेट देत त्यांचा उत्साह वाढविला.

यावेळी गावचे प्रमुख इमाम मौलाना नियाज मुकादम उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक फैयाज यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या आधुनिक व क्रांतिकारी बदलांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच नवीन शैक्षणिक वर्षात परिश्रम, शिस्त आणि सातत्य यांचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

संस्थेचे अध्यक्ष उस्मान खोतू मालवणकर, उपाध्यक्ष डॉ. अजीज सावंत, सचिव अब्दुल कादर अली खांचे, सहसचिव असलम अली जुवळे, शाळा समितीचे चेअरमन नूर मोहम्मद कासम मुकादम, व्हाईस चेअरमन इक्बाल उमर मुकादम, सदस्य जमालुद्दीन अब्दुल्ला मुकादम व गुलाम हुसेन भारदे तसेच पी.टी.ए.चे उपाध्यक्ष फौजान पोफलूनकर यांनी विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरणात झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *