चिपळूणमध्ये घरफोडी, तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल, दोन लाखांहून अधिक किमतीचे दागिने लंपास

banner 468x60

चिपळूण शहरातील पाग कासकर आळी परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या घरातून सोन्याचे दागिने चोरी केल्याप्रकरणी एका १८ वर्षीय तरुणीविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नईमा रफिक झारे (वय ५९, रा. रुम नं. १, शाबीरा मंझील, पाग कासकर आळी, चिपळूण) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दि. ५ जून २०२६ रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते दि. १४ जून २०२६ रोजी दुपारी १ वाजेपर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात सानिया फारुख झारे (वय १८, रा. पाग कासकर आळी, चिपळूण) हिच्यावर आरोप करण्यात आला आहे. आरोपीने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय घरात प्रवेश करून बेडरूमचा बंद दरवाजा उघडला व कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये १ लाख २७ हजार ६०२ रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस, ४३ हजार ५०७ रुपये किमतीची अंगठी, ३६ हजार २७९ रुपये किमतीची दुसरी अंगठी तसेच १ हजार ५२९ रुपये किमतीची नाकातील पुली असा एकूण २ लाख ८ हजार ९१७ रुपयांचा ऐवज आहे.

या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७७/२०२६ नुसार घरफोडी व चोरीसंदर्भातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *