Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

दापोली : 35 लिटर गावठी दारूसह वृद्धावर कारवाई

banner 468x60

दापोली तालुक्यातील वणौशी तर्फे नातू गाववाडी येथे बेकायदा गावठी हातभट्टीची दारू साठवून विक्रीसाठी ठेवणाऱ्या एका व्यक्तीवर दापोली पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ३५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ जून २०२६ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास वणौशी तर्फे नातू गाववाडी येथील एका घराच्या मागील बाजूस असलेल्या जुन्या शौचालयाच्या आडोशाला उघड्या जागेत छापा टाकण्यात आला.

या कारवाईत प्रताप गणपत पाठणे (वय ६८, रा. वणौशी तर्फे नातू गाववाडी, ता. दापोली) यांच्याकडे बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेली गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. आरोपी हा कोणताही परवाना नसताना दारू विक्रीचा चोरटा व्यवसाय करण्याच्या उद्देशाने हा साठा बाळगत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

छाप्यात पोलिसांनी ३५ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या दारूची अंदाजे किंमत ३ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२१/२०२६ दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *