कोकण : आंबोली घाटातून प्रवास करताय? मग, ही बातमी आधी वाचा

banner 468x60

आंबोली घाटात (Amboli Ghat) कोसळलेला दरडीचा काही भाग अखेर बाजूला करण्यात आला. यासाठी युद्धपातळीवर यंत्रणा राबविण्यात आली.

banner 728x90

पावसामुळे दाणोली-बावळाट मार्गावर (Danoli-Bavalat Road) सोमनाथ मंदिर येथे पाणी आल्याने तो रस्ता दाणोली येथे बंद करण्यात आला.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

शुक्रवारी (ता. २१) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबोली येथील दरडीचा काही भाग, तर अन्य दोन-तीन ठिकाणी दगड व माती रस्त्यावर आली होती. सकाळी बांधकामच्या विभाग कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेली माती दूर करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

दरड कोसळल्याची माहिती मिळताच तातडीने त्या ठिकाणी दाखल झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवेत जेसीबी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र दरडीचा भाग कोसळल्यानंतर त्या ठिकाणी कोणतीही आधुनिक यंत्रणा नसल्याचे निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांच्या मदतीने फावड्याने माती काढण्याचा प्रकार सुरू होता.

त्यामुळे याबाबत स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. तालुक्यात गेले चार दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे काल रात्री साडेआठच्या सुमारास आंबोली घाटमार्गात दरड कोसळली. ही दरड रस्त्यावरून दूर करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड या कामावर जातीने लक्ष ठेवून आहेत. दुपारी दोनपर्यंत सर्व दगड व माती बाजूला करून नियमित वाहतूक सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, कोसळलेल्या दरडीतील माती व दगड घाटमार्गावर आल्याने रात्रीपासूनच धीम्या गतीने एकेरी वाहतूक सुरू होती. त्याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला रात्री दिली होती; मात्र रात्रीचा वेळ व मुसळधार पाऊस यामुळे त्या ठिकाणी काम करणे कठीण झाले होते.

येथील बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता सर्वगोड हे आज सकाळी अकराच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत उपअभियंता वैभव सगळे, शाखा अभियंता विजय चव्हाण व अन्य अधिकारी व कर्मचारीही युद्धपातळीवर ही दरड हटविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून आलं आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *