Breaking News

गुहागरमध्ये 27 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, अंजनवेल परिसरात हळहळ

banner 468x60

गुहागर तालुक्यातील अंजनवेल सडेवाडी येथे २७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. २९ मे) दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे अंजनवेल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार विजय सैतवडेकर (वय २७, मुळ रा. अंजनवेल सडेवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. दि. २९ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास ओंकार हा आपल्या राहत्या घरातील किचनच्या छताच्या भाल्याला नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व नातेवाईकांनी तत्काळ धाव घेतली. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद (आमृ. क्र. १९/२०२६) करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास गुहागर पोलीस करत आहेत. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस विविध अंगांनी चौकशी करीत आहेत.

या दुर्दैवी घटनेमुळे अंजनवेल परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *