Breaking News
दापोलीच्या साक्षी पाते यांचा महाराष्ट्रात डंका, ‘AWPL’ कडून ‘काठमांडू-नेपाळ’ टूर बहुमान पटकावला रत्नागिरी : जयगड समुद्रात इंधनाचा मोठा साठा जप्त, ‘शहाना’ बोटीसह पाच जण ताब्यात चिपळूण : गाडी बाजूला घ्या” म्हणताच वाद, चिपळूणात व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून मारहाण, पार्किंगच्या कारणावरून हिंसक हल्ला, बाळू चव्हाण आणि सुयोग चव्हाण दोघांविरोधात गुन्हा दाखल दापोली-खेडमधील वीज समस्यांवर उपाययोजना; नवीन विद्युत उपकेंद्रांसाठी राज्यमंत्री योगेश कदम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी दापोली : वारंवार वीज खंडिततेमुळे नागरिक संतप्त, महावितरण कार्यालयावर धडक आंदोलनाचा इशारा

संगमेश्वर : साखरप्याची सुकन्या आकांक्षा कदम हिने 15 वे राज्यविजेतेपद पटकावले

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील देवडे (साखरपा) येथील आंतरराष्ट्रीय कँरमपटू आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेती आकांक्षा उदय कदम हिने आपल्या शानदार खेळीच्या जोरावर कारकिर्दीतील १५ वे राज्यस्तरीय विजेतेपद पटकावत पुन्हा एकदा कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

banner 728x90

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि सिव्हिल फेडरेशन रोटरी क्लब ऑफ बोरीवली यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली येथील मंडपेश्वर सिव्हिल फेडरेशन (एमसीएफ) येथे २३, २४ आणि २५ मे २०२६ रोजी राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील नामांकित खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत साखरप्याची सुकन्या आकांक्षा कदम हिने सुरुवातीपासूनच आपली दमदार छाप पाडली. संयमी आणि अचूक खेळी करत तिने एकामागून एक सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली. सेमीफायनलमध्ये तिने बलाढ्य प्रतिस्पर्धी मिताली पिंपळे हिचा पराभव करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.

अंतिम सामन्यात तिच्यासमोर ठाण्याची समृद्धी घाडीगांवकर हिचे आव्हान होते. अत्यंत चुरशीच्या आणि तीन सेटपर्यंत रंगलेल्या या लढतीत आकांक्षाने अनुभव, संयम आणि अचूक स्ट्रोक्सच्या जोरावर शानदार विजय मिळवला. या विजयासह तिने आपल्या कारकिर्दीतील १५ वे राज्यविजेतेपद पटकावत आणखी एक मानाचा किताब आपल्या नावावर केला.


आकांक्षा उदय कदम हिला गतवर्षी महाराष्ट्र शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत तिने कॅरम विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.


तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल साखरपा परिसरासह संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. क्रीडा क्षेत्रातील तिच्या सातत्यपूर्ण यशामुळे ग्रामीण भागातील अनेक तरुणींना प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *