खेड : आंबे काढण्याच्या झेल्यावरून वाद; वृद्धाला मारहाण, गुन्हा दाखल

banner 468x60

खेड तालुक्यातील सापिर्ली-भराडवाडी येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत ६५ वर्षीय वृद्ध जखमी झाल्याची घटना २० मे २०२६ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. भरत कृष्णाजी पालांडे असे जखमी वृद्धाचे नाव आहे.

banner 728x90

खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सापिर्ली येथील भरत कृष्णाजी पालांडे (वय ६५) यांनी शेजारी राहणारे सतीश श्रीकांत पालांडे यांच्या मालकीचा आंबे काढण्याचा झेला आरोपींना न विचारता त्यांच्या वडिलांना विचारून आणला होता. याच कारणाचा राग मनात धरून सतीश पालांडे यांनी भरत पालांडे यांना बांबूच्या काठीने पाठीवर मारहाण केली. तसेच हाताने गळा दाबून नखाने चेहऱ्यावर ओरबाडत शिवीगाळ केली. यावेळी फिर्यादी यांच्या आईलाही धक्काबुक्की करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत भरत पालांडे जखमी झाले.

याप्रकरणी भरत कृष्णाजी पालांडे यांनी खेड पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून, त्यानुसार संशयित आरोपी सतीश श्रीकांत पालांडे याच्याविरोधात २१ मे २०२६ रोजी दुपारी ३:१७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *