नवउद्योजिका रितिका गायकवाड यांना ‘परिणीता सन्मान 2026’ पुरस्कार

banner 468x60

नवी मुंबई येथे महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या “परिणीता सन्मान सोहळा २०२६” मध्ये नवउद्योजिका रितिका रितेश गायकवाड यांना “परिणीता सन्मान २०२६” ने गौरविण्यात आले.

banner 728x90

महिलांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या कार्याचा सन्मान करणे आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करणे या उद्देशाने परिणीता सोशल फाउंडेशन यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

फूड इंडस्ट्रीमध्ये कठीण परिस्थितीवर मात करत स्वतःचे “रितिकाज कॅफे” सुरू करून स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या रितिका गायकवाड यांच्या जिद्दीचा आणि उद्योजकीय प्रवासाचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. स्वतःच्या मेहनतीच्या बळावर त्यांनी उभारलेला व्यवसाय अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

या सोहळ्याला आयोजक साक्षी प्रशांत सागवेकर यांच्यासह प्रसिद्ध अभिनेत्री अमृता राव, समाजसेविका ममता सिंधुताई, फुलवा खामकर तसेच अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान महिलांनी विविध क्षेत्रांत आत्मविश्वासाने पुढे येत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी, यासाठी अशा सन्मान सोहळ्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. महिला सक्षमीकरण आणि उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *