दापोली तालुक्यातील दाभोळ रोडवरील निगडे फाटा येथे रविवारी झालेल्या अपघातात गावाची स्वागत कमान कोसळून मोठे नुकसान झाले. अपघाताला एक दिवस उलटूनही कमानीचा मलबा रस्त्यावरच पडून असल्याने परिसरातील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निगडे गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सिमेंट-काँक्रीटची स्वागत कमान उभारण्यात आली होती. रविवारी १७ मे रोजी या मार्गावरून जात असताना एसटी बस आणि डंपर एकमेकांना साईड देत होते. यावेळी दोन्ही वाहनचालकांचा अंदाज चुकल्याने डंपरची जोरदार धडक थेट स्वागत कमानीला बसली.
धडक इतकी भीषण होती की भक्कम बांधकाम असलेली कमान काही क्षणांत कोसळून थेट रस्त्यावर पडली. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा प्रवाशांना दुखापत झाली नाही.
मात्र अपघातानंतर तब्बल एक दिवस उलटूनही कोसळलेल्या कमानीचा मोठा मलबा रस्त्यावरच असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः दाभोळ रोडवरून ये-जा करणाऱ्या वाहनांची वाहतूक मंदावली असून काही ठिकाणी कोंडीची परिस्थिती निर्माण होत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने मलबा हटवून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी केली आहे. तसेच अशा अपघातांनंतर तत्काळ उपाययोजना न झाल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













