गुहागर-विजापूर हायवे तसेच शृंगारतळी परिसरातील मुख्य रस्त्यांवर आणि बाजारपेठेत आपली वाहने निष्काळजीपणे उभी करून सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या तीन वेगवेगळ्या वाहनचालकांवर गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही धडक कारवाई १७ मे रोजी करण्यात आली असून, यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांना आणि पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा ठपका या चालकांवर ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही कारवायांमध्ये आरोपी चालकांवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २८५ अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
वेळंब फाट्याजवळ रस्त्यावर, शृंगारतळी चौकीसमोर आपली टाटा मॅजिक आयरिश गाडी (क्र. MH-08-BK-0802) अस्ताव्यस्त उभी करून वाहतूक कोंडी करणाऱ्या उमेश कृष्णा चव्हाण (वय ३८ वर्षे, रा. गिमवी काजवेवाडी, ता. गुहागर या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई किरण नामदेव चव्हाण यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
त्याच दिवशी वेळंब फाट्याजवळ दुसरी कारवाई करण्यात आली. हायवेवर आपली सुपर कॅरी चारचाकी गाडी (क्र. MH-08-AP-5808) उभी करून येण्या-जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चालक मंगेश शंकर आंबळकर वय ४५ वर्षे, रा. कोंढे माळवाडी, ता. चिपळूण याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार लुकमान सुजात तडवी यांनी फिर्याद दिली आहे.
तिसरी कारवाई शृंगारतळी बाजारपेठेत झाली. येथे
रस्त्यावरच आपली फॅशन दुचाकी (क्र. MH-08-AK-9102) उभी करून पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी मेकॅनिक असलेला चालक अबू शहाजमाल हमजाला वय २२ वर्षे, रा. रोशन मोहल्ला शृंगारतळी, ता. गुहागर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी देखील पोलीस शिपाई किरण नामदेव चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस प्रशासनाचा इशारा: शृंगारतळी बाजारपेठ आणि हायवेच्या मुख्य रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढते. त्यामुळे वाहनधारकांनी अधिकृत जागेतच पार्किंग करावे, अन्यथा यापुढेही अशीच कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा गुहागर पोलिसांनी दिला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














शृंगारतळी बाजार पेठेत, start to end दुतरफा अतिक्रमण आहे.. दुकानदारांचे बोर्ड, फळ वाले, हॉटेल चे स्टोल, टेबल, गॅरेज वाल्यांच्या भंगार दू चाकी.. सगळं असतावेस्त असत. पण कोणी ही कार्यवाही करत नाही.