खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील अवैध पार्किंगमुळे अपघातांचा धोका, भाजप नेते वैभव खेडेकर यांचा खेड पोलिसांना निवेदन

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्ग क्र. ६६ वर कशेडी बोगदा ते चिपळूण दरम्यान महामार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने उभी राहत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तसेच भरणे नाका येथील पुलाखाली करण्यात आलेल्या अवैध पार्किंगमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

banner 728x90

या पार्श्वभूमीवर तातडीने कारवाई करून महामार्गावरील अवैध पार्किंग हटविण्यात यावे, तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्यात, अशा मागणीचे निवेदन भाजपाच्या वतीने खेडचे पोलीस निरीक्षक विवेक आयरे यांना देण्यात आले.

यावेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा अल्पसंख्यांक रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहिम सहिबोल, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, तसेच विजय गुप्ता आणि ओवैस चौगुले उपस्थित होते.

महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *