Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

दापोली : असोंड-सरोदेवाडीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जिर्णोद्धार सोहळ्याची जय्यत तयारी

banner 468x60

दापोली तालुक्यातील असोंड-सरोदेवाडी येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी सेवा मंडळाच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जिर्णोद्धार सोहळा, कलशारोहण, मूर्ती प्राणप्रतिष्ठा व उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. बुधवार दि. १३ मे ते गुरुवार दि. १४ मे २०२६ या कालावधीत हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक विधींसह साजरा करण्यात येणार आहे.

banner 728x90

या सोहळ्यानिमित्त मंदिर परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली असून विविध धार्मिक कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. मंगळवार दि. १२ मे रोजी सायंकाळी ४ वाजता माऊलीची पालखी व कलश मिरवणुकीने सोहळ्याची सुरुवात होणार आहे. सरोदेवाडी ते एस.टी. स्टॅण्ड दरम्यान ही मिरवणूक काढण्यात येणार असून गावातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यानंतर रात्री स्थानिक भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

बुधवार दि. १३ मे रोजी सकाळी ७ वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्रवेश होणार असून सकाळी ७.३० वाजल्यापासून धार्मिक विधींना प्रारंभ होईल. मुख्यदेवतेची प्राणप्रतिष्ठा, विविध पूजाविधी आणि वैदिक मंत्रोच्चारात कार्यक्रम पार पडणार आहेत. दुपारी १२.३० वाजता कलश पूजन व कलशारोहण करण्यात येणार असून दुपारी १ वाजता महाआरती होईल. यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी सुधारक सेवा मंडळ, पावनळ (कोंडवाडी) यांच्या वतीने हरिपाठाचा कार्यक्रम होणार असून रात्री ९.३० ते ११.३० या वेळेत ह.भ.प. संदीपबुवा मांडके (पुणे-आळंदी) यांचे राष्ट्रीय आख्यानपर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

गुरुवार दि. १४ मे रोजी पहाटे काकडा आरतीने दिवसाची सुरुवात होणार आहे. सकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न होणार असून दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, विशेष मान्यवर व देणगीदारांचा सत्कार तसेच वाडीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळाही पार पडणार आहे.

सायंकाळी श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ, आसूद यांचे सुश्राव्य भजन होणार असून रात्री भजनसम्राट मधुसुदन नामये बुवा यांच्या भजनाने सोहळ्याची सांगता होणार आहे.

या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री विठ्ठल-रुक्मिणी सेवा मंडळाचे अध्यक्ष श्सदानंद रामचंद्र आयरे, खजिनदार रामा भिवा रसाळ, कार्यवाह सदाशिव शिवराम रसाळ तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *