चिपळूण तालुक्यातील परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूणच्या गुरुकुल विभागाने माध्यमिक शालांत परीक्षा मार्च २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. गुरुकुल विभागाच्या दुसऱ्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
यंदाच्या परीक्षेत गुरुकुल विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून २० विद्यार्थी विशेष योग्यतेसह उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश मिळवले आहे. ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी विशेष कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
या परीक्षेत रुद्र धन्वंतर वळंजू याने ९७.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. शर्वरी विजय सावंत हिने ९६.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर गंधार सुशांत नाईक याने ९५.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. विशेष म्हणजे गंधार नाईक याला संस्कृत आणि गणित या विषयांमध्ये प्रत्येकी १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत.
तसेच ईश्वरी ओमप्रकाश राजे (९५.००%), अथर्व नागराज वळंजू (९३.४०%), श्रीश मिलिंद तांबे (९३.२०%) आणि अवधूत दत्ताराम लाड (९२.८०%) यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले.
या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शाळा प्रशासनाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













