कोकणात पूरस्थिती, रायगड, रत्नागिरी, चिपळूणमध्ये काय स्थिती आहे? जाणून घ्या

banner 468x60

कोकण पट्टयात मुसळधार पाऊस सुरु आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतोय, परिणामी पश्चिम किनारपट्टीवर पाऊस सुरू  आहे. 

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर* 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या दुथडी भरुन वाहतायत. त्यामुळे पूर सदुश्य स्थितीनिर्माण झाली आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. मागच्या दोन–तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. 

रत्नागिरीजिल्ह्यात पहाटेपासून पावसाचा जोर आहे. सलग दुसऱ्यादिवशी वारे 50 ते 55 किमी वेगाने वाहतय. बंगालच्या उपसागरात दाबनिर्माण झालाय. त्यामुळे पश्चिम किनारकपट्टीवर पावसाचा जोर वाढला आहे. 

चिपळून शहर आणि परिसरात मुसळधार पाऊसकोसळतोय. वशिष्ठ नदीला पूर आलाय. चिपळून शहरात सखल भागात पाणी साचलय. रात्री एनडीआरएफच पथक दाखलझालय. नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिलाय. शिव नदीने धोक्याच्या पातळी ओलांडली आहे. 

आसपासच्या परिसरातमुसळधार पाऊस कोसळतोय. पु़ढचे तीन ते चार दिवस अशी स्थिती राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. खेडमध्ये जगबुडीनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *