राजापूर नगर परिषदेच्या हद्दीतील शिवाजीपथ येथील सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीरपणे मासेविक्री करणाऱ्या १३ महिलांवर राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १३ मार्च रोजी सकाळी १०.३० वा. सुमारास करण्यात आली.
सुमया बोरकर, नाजिया वाडकर, निलोफर होडेकर, अनिसा सोलकर, आक्सा पावसकर, मुमताज तौफिक, मुमताज फडणीस, नसरिन सोलकर (सर्व रा. नाटे, राजापूर), नाजिया मंचेकर, आक्सा सोलकर, मिनाज भाटकर, रुक्साना बोरकर (सर्व रा. कातळी, राजापूर), शबाना काझी (रा. कोंढे तड, राजापूर) अशी गुन्हा दाखल केलेल्या महिलांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात राजापूर नगर परिषदेचे स्वच्छता मुकादम राजन रामचंद्र जाधव (५५, रा. धोपेश्वर पन्हाळे, राजापूर) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, १३ मार्च रोजी फिर्यादी राजन जाधव हे नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक अमित पोवार, सफाई कर्मचारी सुशिल यादव, प्रशांत जाधव, संदेश जाधव असे वरिष्ठांच्या आदेशाने त्या महिलांवर कारवाई करण्यासाठी गेले होते.
ते शिवाजी पथ रोड ते बाजारपेठ जाणाऱ्या रस्त्यावर गेले असता त्यांना या १३ महिला मच्छीविक्री करताना दिसून आल्या. त्यांना मच्छीमार्केटमध्ये मासेविक्री करण्याबाबत सूचना दिल्या असता त्यांनी त्यास नकार देऊन त्याठिकाणीच मासेविक्री करण्यास सुरुवात केली.
या मच्छीविक्रेत्या महिलांमुळे परिसरातील व्यापाऱ्यांना, पादचारी नागरिकांना नाहक त्रास होत आहे. त्या महिला सार्वजनिक ठिकाणी बसून अस्वच्छता करतात त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे या महिलांवर राजापूर पोलिसांनी कारवाई केली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














