संगमेश्वर तालुक्यात सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आणि खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी केलेल्या एका महिलेला संगमेश्वरमधील आंबेड खुर्द येथे आश्रय देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी ६ मार्च २०२६ रोजी रात्री उशिरा मोठी धडक कारवाई करत, संबंधित बांगलादेशी महिलेसह तिला मदत करणाऱ्या तिच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील आंबेड खुर्द मुस्लिम मीहल्ला येथील युसूफ महंमद सय्यद याने सिनेम युसूफ सय्यद उर्फ शांतना अहमद खान (मूळ रा. खिलगाव, जिल्हा गाजीपुर, ढाका, बांगलादेश) ही परदेशी नागरिक आहे, हे पूर्णपणे माहित असतानाही तिच्याशी लग्न केले, आरोपी युसूफने तिला भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करण्यासाठी केवळ आश्रयच दिला नाही, तर ती भारतीय नागरिक असल्याचे भासवण्यासाठी तिची बनावट सरकारी कागदपत्रे तयार करून घेतली.
या बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्डच्या आधारे चक्क कॅनरा बँकेत खाते उघडून भारतीय प्रशासकीय आणि बँकिंग व्यवस्थेची मोठी फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान या प्रकरणात कतार कनेक्शन असल्याचीही शक्यता तपासली जात आहे. दरम्यान या प्रकरणाचा कतार,बांगलादेश कनेक्शन? काय आहे याचा सविस्तर तपास सुरु आहे. आर्थिक रसद नेमकी कुठून येते काही आर्थिक व्यवहार किंवा संपर्क परदेशातून होत होते का याची चौकशी सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहितीसाठी कोकण कट्टा न्यूजने तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रमेश गावित यांच्याजवळ संपर्क केला आम्ही सध्या या प्रकरणाची सर्व बाजूने तपास करत आहोत. सध्या संशयित आरोपींना पोलीस कोठडी दिली असून बनावट कागदपत्रांचे रॅकेट किती मोठं आहे. याचा तपास सुरु आहे.
अजून किती दाखले दिले गेले आहेत. दरम्यान या प्रकरणाचा कतार,बांगलादेश कनेक्शन? काय आहे याचा सविस्तर तपास सुरु आहे.
आर्थिक रसद नेमकी कुठून येते हे आम्ही तपासात आहोत. या प्रकरणामागे बांगलादेश कनेक्शन आणि फेक डॉक्युमेंट रॅकेट कार्यरत असू शकतो. सध्या या कनेक्शनची सखोल चौकशी सुरू आहे.
संगमेश्वर पोलिसांच्या माहितीप्रमाणे, या प्रकरणातील बनावट कागदपत्रे केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून, मोठ्या प्रमाणात फेक ओळखपत्रे तयार करण्याचे नेटवर्क कार्यरत असण्याची शक्यता आहे. यामध्ये आर्थिक व्यवहार, बँक खाते उघडणे, आणि कागदपत्रांवरून फसवणूक यांचा समावेश होतो.थेट बांगलादेशातील महिला कोकणात येऊन सरकारी कागदपत्रे कशी तयार करू शकली आणि यामागे मोठे बनावट कागदपत्रांचे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या तपास सुरू असल्यामुळे अंतिम निष्कर्ष समोर आलेला नाही, पण या प्रकरणामुळे कोकणात बनावट सरकारी कागदपत्रांच्या नेटवर्कचा मोठा मुद्दा पुढे येण्याची शक्यता आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














