Breaking News
दापोली : जमीन घोटाळा? 621 गुंठे वक्फ जमीन व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करा, चौकशी पूर्ण होईपर्यंत बांधकाम आणि तृतीय पक्षाला हस्तांतरणास स्थगिती देण्याची मागणी, जाकीर शेकासन यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार चिपळूण : कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभागातून अॅल्युमिनियम पत्रे, लोखंडी पाईपची चोरी, एकाविरोधात गुन्हा चिपळूण : कळंबस्ते येथे मध्यरात्री संशयास्पद हालचाली; इसम पोलिसांच्या ताब्यात दापोली : दारू पिल्यानंतर बेशुद्ध पडलेल्या 25 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू दापोली : घरात कामाला येणाऱ्या महिलेवर चोरीचा आरोप, 98 हजारांचे दागिने आणि रोकड लंपास

लांजा : जमिनीच्या वादातून मालमत्तेचे नुकसान, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

banner 468x60

लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक (डोळसवाडी) येथे जमिनीच्या वादातून एका ६७ वर्षीय वृद्धेच्या मालमत्तेचे नुकसान करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिपाली दिपक डोळस (वय ६७, रा. कुर्ला, मुंबई; मूळ रा. वेरवली बुद्रुक) यांची वेरवली बुद्रुक येथे गट क्र. ८९९ आणि ९०७ मध्ये सामाईक मालकीची जमीन आहे. २३ जानेवारी ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत, या जमिनीतून रस्ता करण्यासाठी आरोपींनी फिर्यादीची कोणतीही संमती न घेता अतिक्रमण

केले.शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.जमिनीला असलेले चिऱ्याचे कंपाउंड आणि सिमेंटचे खांब तोडून टाकले. त्या ठिकाणी अनधिकृतपणे चिरे लावून अतिक्रमण केले.जेव्हा फिर्यादीने या प्रकाराबाबत विचारणा केली, तेव्हा आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.​याप्रकरणी पोलिसांनी विशाल मारुती डोळस (रा. वेरवली बुद्रुक, लांजा), प्रशांत हरीश्चंद्र शेट्ये (मूळ रा. रायपाटण, सध्या रा.

कल्याण),प्रदिप श्रीधर डोळस (रा. वेरवली बुद्रुक, लांजा) या व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ​फिर्यादी दिपाली डोळस यांनी २७ फेब्रुवारी रोजी लांजा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२९(३), ३२४(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ३४/२०२६ नुसार नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास स्थानिक पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *