रत्नागिरी : नाटे पोलिसांकडून गुटख्यावर मोठी कारवाई, साडेसात लाखांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ आणि प्रतिबंधित गुटख्याविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या गस्तीदरम्यान, पोलिसांनी एका संशयास्पद कारची झडती घेतली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ‘विमल पान मसाला’ आणि प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला. या कारवाईत वाहन आणि गुटख्यासह एकूण ७,९३,५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

२६ फेब्रुवारी २०२६ रोजी सागेरी नाटे पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी धारतळे ते नाटे जाणाऱ्या सागरी महामार्गावर पेट्रोलिंग करत होते. यावेळी ‘धाऊलवल्ली फाट्याजवळ’ समोरून येणारी ह्युंदाई व्हेन्यू (गाडी क्र. MH 08 BB 3303) पोलिसांना संशयास्पद वाटली.

पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली असता, गाडीत कापडी पिशव्यांमध्ये विमल पान मसाला आणि तंबाखूचे पाकीट लपवून ठेवल्याचे उघड झाले.
जप्त केलेला मुद्देमाल:

  • विमल पान मसाला: १९८ नगांचे २२ पॅकेट्स (किंमत ३९,२०४ रुपये)
  • तंबाखू किंग पॅक: १९८ नग (किंमत ४,३५६ रुपये)• ह्युंदाई व्हेन्यू कार: अंदाजे किंमत ७,५०,००० रुपये
  • एकूण किंमत: ७,९३,५६० रुपये

या प्रकरणी पोलिसांनी मारुती बापू कोकणे (वय ३७, रा. म्हैसाळ, ता. मिरज, जि. सांगली; सध्या रा. रत्नागिरी) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांसह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या नियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात जनहित आणि आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधित असलेला गुटखा बेकायदेशीरपणे बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस कर्मचारी दत्तात्रय पाटील,सागर गुरव, नाटेकर, गवाणकर आणि मोगरकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि प्रमोद वाघ करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *