रत्नागिरी : शासकीय रुग्णालयांत मिळणार पूर्वीप्रमाणेच मोफत उपचार

banner 468x60

रत्नागिरी शासकीय रुग्णालयांत पूर्वीप्रमाणेच मोफत उपचार मिळणार आहेत. नागरिकांच्या सनदेत सरकारी रुग्णालयात शुल्क लागणार, असे अनवधानाने समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, 9 फेब्रुवारीच्या शुद्धिपत्रकान्वये वगळण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील शासकीय रुग्णालयांत पूर्वीप्रमाणेच रुग्णांची तपासणी, उपचार मोफतच होणार असल्याचे परिपत्रक आरोग्य विभागाने जारी केले आहे.

रत्नागिरी शासकीय रुग्णालयाकडूनही उपचार, तपासणी मोफतच सुरू राहील, असे सांगण्यात आले.सार्वजनिक आरोग्य विभागाने 16 जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या नागरिकांच्या सनदेमधील परिशिष्ट तीन मध्ये सेवा सुविधा पुरविण्यासाठी 6 जून 2015 च्या शासन निर्णयातील शासन मान्य दर अनावधानाने समाविष्ट झाले असल्याचे सांगून आरोग्य विभागाने चक्क यू टर्न घेतला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली शासकीय रुणालयामध्ये तपासणी व उपचार नि:शुल्क करण्यात आलेले असल्याने नागरिकांच्या सनदेमधील परीशिष्ट तीन हे 9 फेब्रुवारीच्या शुद्धी पत्रकान्वये वगळण्यात आले आहे, अशी माहिती रत्नागिरी सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये जे संभ्रम होत होते ते दूर झालेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *