कणकवली : वरवडे येथे मावस बहिणीकडे आलेली मुस्कान अब्दुल सोलकर (वय 20, रा. मालवण) ही तरुणी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना बुधवारी घडली. याबाबत कणकवली पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुस्कान ही काही दिवसांपासून वरवडे-खालची मुस्लिमवाडी येथे आपल्या मावस बहिणीकडे आली होती. बुधवारी सकाळी सुमारे 11.45 वाजता ती कणकवली येथून मालवणकडे जाणाऱ्या एसटी बसने मालवणला जात असल्याचे सांगून घरातून निघाली. मात्र दुपारी सुमारे 1.30 वाजता तिच्या आईने फोन करून मुस्कान घरी पोहोचली नसल्याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला; मात्र ती कुठेही आढळून आली नाही.
दरम्यान, तिच्याकडे असलेल्या मोबाईलवर संपर्क साधण्याचाही प्रयत्न करण्यात आला; मात्र त्याबाबत ठोस माहिती मिळू शकली नाही. अखेर शोध लागला नसल्याने कौसर जहीर अब्बास ठाकूर (वय 30, रा. वरवडे-खालची मुस्लिमवाडी) यांनी कणकवली पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
मुस्कान हिची उंची 5 फूट 3 इंच असून ती अंगाने सडपातळ आहे. तिचा रंग निमगोरा, चेहरा उभट असून केस काळे व लांब आहेत. ती घरातून निघताना जांभळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस (पांढऱ्या डिझाइनसह) परिधान केला होता व पायात काळ्या रंगाचे सँडल होते. तिच्याकडे ओपो कंपनीचा मोबाईल असल्याची माहिती आहे.
या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. कणकवली पोलिसांनी संबंधित बसमार्ग, बसस्थानक परिसर तसेच सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरू केली असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे. वरील वर्णनाची तरुणी आढळल्यास त्वरित कणकवली पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















