चिपळूण: विनापरवाना खैर लाकूड जप्त, वन विभागाची कारवाई

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील असुर्डे महामार्गावर विनापास खैर लाकूड वाहतूक करणाऱ्या लाकूडचोरांवर वन विभागाने कारवाई करत मोठ्या प्रमाणात खैर लाकूड जप्त केले. ही कारवाई वनपाल अधिकारी रेशमा कावळे आणि जाधव यांच्या पथकाने आज सकाळी सुमारे ९.३० वाजता केली.

पथकाने झेनॉन गाडीतून संशयास्पदरीत्या होत असलेली खैर लाकूड वाहतूक थांबवून गाडी ताब्यात घेतली. त्यानंतर ही गाडी असुर्डे येथील पटेल मिल येथे जमा करण्यात आली. गाडीची चावीही वन कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतली असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.

तन्मय मंगेश सुर्वे (साखरपा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ८० मण खैर लाकूड विनापरवाना दहीवली येथील कात-भट्टीकडे नेले जात होते. लाकूड काढण्याचा व वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वन विभागाच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध लाकूड वाहतूक रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *