चिपळूण : वालोपे येथे गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड, १.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील वालोपे परिसरात बेकायदा गावठी दारू तयार करणाऱ्या हातभट्टीवर पोलिसांनी शुक्रवारी घातलेल्या धाडीमध्ये १.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मंदार मधुकर दिवेकर (30, भिले) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे बाळू पालकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिवेकर हा वालोपे येथील नदीकिनारी हातभट्टी उभारून गावठी दारू गाळताना पोलिसांच्या पथकाला आढळला. ठिकाणावरून गुळ-नवसागरमिश्रित रसायन, अंदाजे २० लिटर गावठी दारू आणि अन्य साहित्य असा एकूण १ लाख ८२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *