लांजा येथील वाकेड फाटा (ता. लांजा) येथे रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने उडविले. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
स्वप्नील गणपत बराम (वय ४०, रा. वाकेड, ता. लांजा) असे मृत पादचाऱ्याचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १६) सकाळी नऊच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील बराम हे सकाळी आठच्या सुमारास चालत वाटूळ येथे कामाला जात होते. रस्त्यातून जात असताना अज्ञात वाहने त्यांना धडक दिली.
त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे वडिल गणपत बराम यांनी अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















