Breaking News
रत्नागिरी : अशीही फसवणूक, “तुमचे गॅस बिल अपडेट झालेले नाही. त्यामुळे आजच तुमचे गॅस कनेक्शन बंद केले जाईल,”फसवणुकीचा नवा फंडा, गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोबाईल हॅक करून खात्यावर डल्ला चिपळूण : डेरवण-राजेवाडी धरण दुरुस्तीला वेग; 14.99 कोटींच्या कामाची आमदार शेखर निकम यांच्याकडून सखोल पाहणी कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये अवैध मद्यसाठा जप्त; परिचारक रंगेहाथ पकडला गुहागर : टाटा आयरीशचा चुकीचा टर्न आणि तरुणाचा जागीच मृत्यू, अपघातात दुसरा गंभीर जखमी खेड : व्यवस्थापन क्षेत्रात करिअरची संधी MBA / MMS प्रवेशासाठी ATMA 2026 द्वारे सुवर्णसंधी, घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

खेड : अल्पवयीन युवकाशी असभ्य वर्तन, तरुणावर गुन्हा दाखल

banner 468x60

खेड तालुक्यात एका ११ वर्षीय अल्पवयीन युवकाशी अत्यंत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी एका तरुणावर बुधवारी रात्री येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी नरसिंहनारायण सिंग (वय ३५, रा. बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

banner 728x90


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि पीडित युवकाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही संतापजनक घटना दिनांक २९ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास तालुक्यातील एका गावात घडली. पीडित अल्पवयीन युवक घराबाहेर खेळत असताना संशयित रवी सिंग याने त्याला जवळ बोलावले आणि त्याच्याशी असभ्य वर्तन केले. हा प्रकार घडल्यानंतर पीडित युवकाने तातडीने ही बाब आपल्या वडिलांच्या कानावर घातली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वडिलांनी त्वरित खेड पोलीस ठाणे गाठले आणि संशयित रवी नरसिंहनारायण सिंग याच्या विरोधात रीतसर तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा भादंविच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.


या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड हे करत आहेत. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून संशयिताला लवकरच अटक केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *