कोळथरे : सेवा पंधरवडा निमित्त भाजपा कोळथरे आयोजित बसस्टँड परिसरात स्वच्छता अभियान

banner 468x60

सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत भाजपा कोळथरे मंडळाच्या वतीने बसस्टँड परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कोसळणारा पाऊस असतानाही कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याने कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल असलेले प्रेम, पक्षाप्रति असणारे समर्पण आणि सामाजिक जाणीव या भावनेतून बुथ क्र. ३६५ व ३६६ मधील कार्यकर्त्यांनी परिसर स्वच्छ केला. जमा झालेले प्लास्टिक चिपळूण येथे रीसायकलसाठी पाठवण्यात आले. तसेच सार्वजनिक ठिकाणची वाढलेली झाडी कापून जागा वापरण्यायोग्य करण्यात आली.


या अभियानात प्रमुख उपस्थितीत युवा कार्यकर्ते मिहीर महाजन, बुथ अध्यक्ष विद्याधर जोशी, बूथ अध्यक्ष प्रतीक जाधव, प्रवीण तोडणकर, महेंद्र जोशी, सचिन चव्हाण, बबा गुरव, संदीप झगडे, राजेंद्र झगडे, जयंत जोशी, प्रकाश खांबेटे आदी कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *