दापोली : हरित कौशल्ये आणि हवामान वित्तीयतेद्वारे युवक सबलीकरणाचा उपक्रम

banner 468x60

२१ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय युवक हवामान संमेलन (NYCC) च्या हवामान चॅम्पियन फेलोशिप अंतर्गत कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री, दापोली येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचा उद्देश कोंकणातील युवकांचे स्थलांतर कमी करून शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा होता. कार्यशाळेत सहा तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत ६० युवकांनी सहभाग घेतला.


सत्रांमध्ये विविध तज्ज्ञांनी महत्त्वाचे विषय मांडले. शुभम कनुरे (MITCON) यांनी कार्बन क्रेडिट व जैवविविधता, वैष्णवी रानमाळे (घोडावत कंज्युमर लिमिटेड) यांनी पर्यावरणीय, सामाजिक व शासन व्यवस्थापन (ESG), रोशनी मेढेकर (पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, महाराष्ट्र) यांनी पर्यावरण प्रभाव मूल्यांकन (EIA), गौरव कापरे (ग्रीनस्पायर सोल्यूशन्स) यांनी हरित उद्योजकत्व, तर सुरज रंजना (इस्रो) यांनी आपत्ती व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन केले.


कार्यक्रमादरम्यान YCIC आणि YFN इंडिया फाऊंडेशन तर्फे कोकण विभाग उदयोन्मुख हरित उद्योजक पुरस्कार कु. किमया जोशी यांना प्रदान करण्यात आला.

त्या बांबू व औषधी वनस्पती नर्सरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्न निर्माण करण्याचे कार्य करीत आहेत.
हा उपक्रम कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री, दापोली, YFN इंडिया फाऊंडेशन, कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री माजी विद्यार्थी संघटना आणि ग्रीनस्पायर सोल्यूशन्स यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *