Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू
Kokan  

गुहागर : 7 गावांमध्ये पाणी टंचाई

banner 468x60

कोकण कट्टा लाईव्ह

एप्रिलच्या सुरूवातीला पाणी टंचाईची झळ तालुक्यातील 7 गावांना जाणवू लागली असून त्यांनी टँकरची मागणी केली आहे.

banner 728x90 banner 728x90

यातील तीन गावांना ग्रामपंचायतीमार्फत टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.तालुक्याच्या टंचाई कृती आराखड्यामध्ये 8 गावांमधील 8 वाड्यांना यावर्षी पाणी टंचाई जाणवेल, असे प्रशासनाने म्हटले आहे.

यामध्ये आंबेरे खुर्द, झोंबडी, काताळे, धोपावे, पाचेरीसडा आणि गोळेवाडी या गावांचा समावेश आहे. मात्र प्रत्यक्षात आराखड्यामधील धोपावे गावाने टँकरची मागणी केली आहे. परंतु या आराखड्याबाहेरील 6 गावांमध्ये जानेवारीपासूनच टंचाई जाणवत आहे.

यामुळे आराखड्यामधील गावे धरून यावर्षी टंचाईग्रस्त गावांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होणार आहे. तालुक्यातील वेलदूर व रानवी या दोन गावांत जानेवारीपासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे.

यावर ग्रामपंचायतींनीच ग्रामनिधीतून आपल्या गावातील वाड्यांना एक दिवस आड टँकरने पाणी पुरवठा केला. त्यानंतर अंजनवेल गावातील कातळवाडी व सुतारवाडीला टंचाई जाणवू लागली आहे.

मात्र एप्रिल महिन्याच्या 19 तारखेपासून आरजीपीपीएलने टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *