दाभोळ : कौटुंबिक वादातून हाणामारी, महिला व पती जखमी

banner 468x60

दापोली तालुक्यातील दाभोळ कोळथरे गोवलेवाडी येथे कौटुंबिक वादातून हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या घटनेत एका महिलेच्या डोक्यात दगड मारून गंभीर दुखापत करण्यात आली असून, तिच्या पतीलाही मारहाण करून जखमी करण्यात आले आहे.

वाद चिघळला, दारूच्या नशेत हाणामारी

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रूपेश अशोक गोवले हा दारूच्या नशेत घर व जमिनीच्या वादातून धनश्री धनंजय गोवले (वय 50) यांच्यावर शिवीगाळ व दमदाटी करीत होता. या वादाला ऊत आला आणि फिर्यादीने आरोपीला इशारा देत पलीता तापवून चेहऱ्यावर चटका दिला.

दगडफेकीत महिला गंभीर जखमी

याचा राग मनात धरून आरोपी रूपेश गोवले याने महिलेच्या डोक्यात दगड फेकला. या हल्ल्यात धनश्री गोवले गंभीर जखमी झाल्या. इतक्यावरच आरोपी थांबला नाही तर मधे आलेल्या महिलेच्या पतीलाही डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. शिवाय, दोघांना जीवघेणी धमकी दिल्याचेही समोर आले आहे.

गुन्हा दाखल, तपास सुरू

या प्रकरणी दाभोळ पोलिसांनी गु.र.नं. 20/2025 नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 118(1), 352, 351(2)(3) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जखमींवर उपचार सुरू असून पुढील तपास दाभोळ पोलीस करीत आहेत.

या घटनेमुळे कोळथरे गावात भीतीचे वातावरण पसरले असून, पुन्हा एकदा कौटुंबिक वाद जीवघेण्या स्वरूपात वाढल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *