दापोली : चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांचे भारतीय जवानांस पत्र

banner 468x60

दापोली तालुक्यात चंद्रनगर जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचे औचित्य साधून भारतीय जवानांस पत्रलेखन केले आहे. ही सर्व पत्रे आता भारतीय जवानांपर्यंत पोहोचतील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.


सध्या संपूर्ण भारत देशात ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून चंद्रनगर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भारतीय सीमेवर तैनात असलेल्या व डोळ्यात तेल घालून आपल्या भारत देशाचे रक्षण करीत असलेल्या सर्व भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी पत्रे लिहिली आहेत.

उन, वारा, थंडी, पाऊस, विपरित परिस्थिती तसेच शत्रु सैन्याचे हल्ले आदी संकटांचा सामना करीत असताना आपले भारतीय जवान रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सीमेवर जागता पहारा देत आहेत. आपले आईवडील, पत्नी, मुले आदी कुटुंबियांपासून दूर राहून देशाच्या रक्षणाच्या कर्तव्यावर तैनात असलेले भारतीय सैनिक म्हणजे आपल्या देशाचे खरे रक्षक आहेत.

अशा सर्व भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी भारतीय जवानांना पत्रे लिहीली आहेत. चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *