भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची सध्या जगभरात चर्चा होत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून भारताने आपले लष्करी सामर्थ्य संपूर्ण जगाला दाखवले आहे. विशेष म्हणजे भारताच्या या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे आर्थिक तसेच सामरिक नुकसान झाले आहे.

दरम्यान लोकमान्य टिळक विद्यामंदिर आणि ज्यू कॉलेज चिखलगाव येथे, नुकत्याच झालेल्या ऑपेरेशन सिंदूर या संपूर्ण ऑपेरेशनची माहिती देण्यासाठी लेफ्टनंट कर्नल सर्वांनन आणि मेजर मैत्रयी दांडेकर ( निवृत्त ) यांनी मोहिमेबाबतची माहिती दिली.


ई 8 वी ते ई 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लेफ्ट कर्नल सर्वांनन हे इन्फ्रन्ट्रीमध्ये गेली 15 वर्ष कार्यरत आहेत, तसेच ऑपेरेशन सिंदूरमध्ये त्यांना आर्मी इंटेलिजन्टची जवाबदारी होती.


पहेलगाम हल्यापासून ते पाकिस्तान कडून युद्ध बंदीची घोषणा होई पर्यंत घडलेल्या घटना, भारताची राजकीय रानणिती, तसेच तिन्ही सेनादालांचे काम या वर सखोल माहिती मुलांना देण्यात आली.


अतिशय सोप्या भाषेत लेफ्ट कर्नल सर्वांनन यांनी हे मुलांना समजावून दिले. विविध फोटो, युद्धानीती, भारताची तयारी, आर्मी ची जवाबदारी तसेच आता पुढील रानाणिती या वरही चर्चा झाली. सोबत मुलांच्या प्रश्नांना हीं अतिशय मार्मिक उत्तर मिळाली.

अतिशय उत्तहाच्या वातावरणात हा कार्यक्रम शाळेत पार पडला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















