Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

लांजा : बंधाऱ्यावरून पाय घसरून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

banner 468x60

मुंबई बोरिवली येथून मामाच्या गावी आली होती
तालुक्यातील आंजणारी मठ येथील काजळी नदीत एक हृदयद्रावक घटना घडली.

नदीतील बंधाऱ्यावरून जात असताना पाय घसरल्याने १९ वर्षीय तरुणी अनुष्का अनिल चव्हाण (रा. कोडगे, ता. लांजा, सध्या मुंबई बोरिवली) हिचा नदीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.


मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का आपल्या लांजा तालुक्यातील पुनस कोंड येथील मामाच्या गावी आली होती. आज शनिवारी ती मामाच्या मुलांसोबत आंजणारी येथील काजळी नदीकिनारी असलेल्या दत्त मंदिरात दर्शनासाठी गेली होती. रत्नागिरी एमआयडीसीने बांधलेल्या बंधाऱ्यावरून चालत पलीकडच्या दत्त मंदिरात जात असताना, तिचा पाय अचानक घसरला आणि ती नदीत पडली.


अनुष्काला पोहता येत नसल्याने, नदीच्या वेगवान प्रवाहाबरोबर ती सुमारे शंभर फूट वाहत गेली आणि पाण्यात बुडून तिचा दुर्दैवी अंत झाला. घटनेनंतर तिला पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

या दुर्दैवी घटनेमुळे पुनस कोंड आणि कोडगे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *