रायगड-रत्नागिरीत पावसाचा ‘रेड अलर्ट’ 22 ते 24 मे दरम्यान अतिमुसळधार पावसाचा इशारा

banner 468x60

भारतीय हवामान विभागाने (IMD) 23 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Rain) इशारा दिला आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचा तसेच आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने 22 ते 24 मे दरम्यान कोकण, गोवा आणि पश्चिम किनारपट्टीसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

विशेषतः मुंबई आणि परिसरात 23 मे रोजी संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे जलमय परिस्थिती आणि वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. मुंबई महानगर प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट दिला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *