दापोली : विहिरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

banner 468x60

दापोली तालुक्यातील किन्हळ येथे एका मतिमंद तरुणाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १९ मे रोजी दुपारी ३.०१ वाजता उघडकीस आली.

banner 728x90 banner 728x90

संयोग सुनील येसवारे (वय २४, रा. किन्हळ, ता. दापोली) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याला दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, सायंकाळी ५.३० वाजता मृत घोषित करण्यात आले.

या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *