दापोली : हर्णै मारहाण प्रकरणी 5 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी, आणखी २ आरोपी अटकेत

banner 468x60

दापोली तालुक्यातील हर्णे येथील भुईकोट गोवा किल्ला परिसरात झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत ५ आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळवली असून आणखी २ आरोपींना अटक करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, २६ मे मंगळवारी रात्री सुमारे ११ ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान हर्णे येथील बंदर मोहल्ल्यातील २ ते ३ तरुण भुईकोट गोवा किल्ला परिसरात धूम्रपान व मद्यपान करत होते. यावेळी हर्णे येथील काही तरुणांनी त्यांना समज देत तेथून परत पाठवले. याआधीही अशीच घटना घडल्याचे सांगण्यात आले असून तेव्हाही संबंधितांना समज देण्यात आली होती.

घटनेनंतर पोलिसांनी बुधवारी रात्री ५ आरोपींना ताब्यात घेतले. त्यामध्ये :

जेन अस्लाम हुनेरकर (वय २२)
मूफिज जावेद सोलकर (वय २३)
सलाह हसन कोंडविलकर (वय १९)
नाबील निसार काझी (वय १९)
जैन ताजुद्दीन जमादार (वय २०)

यांचा समावेश आहे. या प्रकरणात ५ आरोपींना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तसेच पोलिसांनी पुढील तपासादरम्यान आणखी दोन आरोपींना अटक केली असून त्यामध्ये हर्षद अझीम हुनेरकर (वय २५) आणि नाईफ आरिफ श्रीवर्धनकर (वय १९, रा. हर्णे बंदर मोहल्ला) यांचा समावेश आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, “येथे धूम्रपान करू नका,” असे चिन्मय गुरव आणि महेंद्र रघुवीर यांनी सांगितल्याने दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. रात्री झालेल्या या वादामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. किल्ला परिसरात धूम्रपान व मद्यपान केल्याच्या संशयावरून सुरू झालेला वाद पुढे दोन समाजांतील युवकांमधील संघर्षात परिवर्तित झाला. मात्र, मंगळवारी रात्री दोन्ही समाजातील वरिष्ठ नागरिकांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला होता.

तथापि, या घटनेचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी, बुधवारी २७ मे रोजी संध्याकाळी सुमारे ६ ते ६.३० वाजण्याच्या दरम्यान, धूम्रपानास विरोध करणाऱ्या चिन्मय गुरव आणि महेंद्र रघुवीर यांच्यावर १५ ते २० युवकांच्या समूहाने हल्ला केला. किल्ल्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी लाकडी दांडके आणि लोखंडी सळ्यांनी दोघांना बेदम मारहाण करण्यात आली.

या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून महेंद्र रघुवीर यांच्यावर चिपळूण येथील डेरवण येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. तर चिन्मय गुरव यांच्यावर खेड येथे उपचार सुरू आहेत. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *