रत्नागिरी-रायगडसह 3 जिल्ह्यात 72 तास अति मुसळधार पावसाचा इशारा

banner 468x60

महाराष्ट्रात पुढचे 72 तास महत्त्वाचे आहेत. याचं कारण म्हणजे 5 जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

रायगड रत्नागिरी जिल्ह्यात आज हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. इथे अति मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भाग वगळता आज संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

26 ते 28 जून दरम्यान मुसळधार पाऊस रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मान्सून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाने केली असून 26 ते

28 जून असे तीन दिवस मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. 27 जूनला रायगड सह रत्नागिरी, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *