मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथे सावित्री नदीच्या खाडी किनारी चिखलामध्ये ३९ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव विशाल महादेव सतार (वय ३९, रा. तळोशी, ता. महाड, जि. रायगड) असे आहे. विशाल सतार यांचा मृतदेह म्हाप्रळ येथील सावित्री नदीच्या खाडी किनारी मजीद अहमद मकादम यांच्या प्लॉटजवळ चिखलात आढळून आला.
ही घटना २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्यापूर्वी घडल्याची नोंद आहे. मृतदेह आढळल्यानंतर या घटनेची माहिती मंडणगड पोलिसांना देण्यात आली.
त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यू क्रमांक १५/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये नोंद केली आहे.
विशाल सतार यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. या प्रकरणी मंडणगड पोलीस पुढील तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













