दापोली तालुक्यातील हर्णे वाकडीबेंड येथे समुद्रकिनाऱ्याजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. आज, २५ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास ही घटना किनाऱ्यालगत राहणाऱ्या ग्रामस्थांच्या निदर्शनास आली.
समुद्रकिनाऱ्याजवळ मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह ताब्यात घेण्याची तसेच त्याची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मृत व्यक्ती कोण आहे, त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि हा मृतदेह समुद्रातून वाहून आला आहे का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास केला जात आहे.
दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती कार्यवाही सुरू असून, या घटनेमागील नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













