चिपळूणमध्ये 20 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील बावशेवाडी येथील २० वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सुजल किरण गमरे (वय २०, रा. बावशेवाडी, खंड, ता. चिपळूण) असे मयत तरुणाचे नाव आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, सुजल गमरे हा १२ ऑगस्ट रोजी मित्रांसोबत कर्जत-लोणावळा येथे फिरून घरी परतला होता. त्यानंतर त्याची तब्येत बिघडल्याने त्याला उपचारासाठी चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर अधिक उपचारांची आवश्यकता असल्याने त्याला डेरवण, सावर्डे येथील वालावालकर हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार १४ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २ वाजता सुजलला वालावालकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

डेरवण येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ५.२१ वाजता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.२९ वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आमृ क्रमांक ५२/२०२६ अशी नोंद आहे.

सुजलच्या मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणी व संबंधित अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. त्याच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबीय व मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *