गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह वाशिष्ठी नदीच्या पात्रात आढळून आल्याची घटना २८ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. गोवळकोट गावातील शिंदेवाडी येथील गणपती विसर्जन घाट परिसरात हा मृतदेह आढळला.
अंकिता रविंद्र गोरीवले (वय २५, रा. पिंपळी सोनारवाडी, ता. चिपळूण) असे मृत तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता गोरीवले ही २५ ऑगस्ट २०२६ रोजी बेपत्ता झाली होती. याबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात नापत्ता रजिस्टर क्रमांक ४९/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली होती. त्यानंतर तिचा शोध सुरू होता.
दरम्यान, २८ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ९.१५ वाजता गोवळकोट गावातील शिंदेवाडी येथील वाशिष्ठी नदी किनारी असलेल्या गणपती विसर्जन घाटाच्या नदीपात्रात अंकिता हिचा मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी उपजिल्हा रुग्णालय, कामथे येथे नेण्यात आला.
याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ५५/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













