Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

खेड : वेरळ येथे टेम्पोवर फांदी कोसळली; टेम्पोचं नूकसान

banner 468x60

वेरळ-खोपी मार्गावरील वेरळ गावच्या हद्दीत जुन्या झाडाची फांदी डमडम टेम्पोवर कोसळली. सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झालेली नाही. वेरळ-खोपी मार्गावर जलाल शहा बाबा दर्गा परिसरात अनेक जूनी झाडे आहेत. ती पावसाळ्यात उन्मळून पडतात. सततच्या पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक तशी तुरळकच होती. हेदली येथील तरुण राहुल माने हा ताब्यातील डमडम टेम्पो घेऊन घराकडे निघाला होता. वेरळ दर्ग्याच्या पुढे गाडी गेली तेव्हा कसला तरी मोठा आवाज त्याला ऐकू आला. त्याने इकडे तिकडे पाहीले तर टेम्पोवर पाठीमागील बाजूस एक झाडाची फांदी पडलेली दिसली. प्रसंगावधान राखून त्याने तेथून गाडीमधून उतरुन बाजूला जाणे पसंत केले. मात्र गाडीवर मोठी झाडाची फांदी तुटून पडलेली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *