Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

खेड : परदेशात नोकरी लावण्याचे आमिष, रत्नागिरीतील 13 तरुणांना लाखोंचा गंडा

banner 468x60

तुर्की, मलेशिया, कुवेत या देशांमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत १३ तरुणांची १४ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार मोहम्मद सलीम अब्दल्ला सैन (रा. डाकबंगला-खेड) यांनी खेड पोलिस स्थानकात दाखल केली आहे.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर* 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909


तालुक्यातील साखरोली येथील रहिवासी असलेल्या एका एजंटाने परदेशात नोकरी लावण्याचे आमीष दाखवत १३ तरूणांकडून ऑनलाइन १४ लाख ३५ हजार रूपये स्वीकारले.

या तरूणांना त्या माणसाने व्हिसा, परमिट, खोटी तिकिटे व काही कागदपत्रेही दिली.

मात्र, हे सर्व बनावट असल्याचे समोर आले आहे. नोकरीला लावतो सांगून पैसे उकळून फसवणूक केल्याची तक्रार खेडसह दापोली पोलिस स्थानकातही दाखल करण्यात आल्याचे मोहम्मद सैन यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *