21 ते 25 जुलै जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 कोणत्याही प्रकारचीअनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी शाळा (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक) विद्यालयांना उद्या शनिवार 22 जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेशजिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज दिला. जिल्हयाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने व खेड तालुक्यातील जगबुडीनदीने इशारा पातळी ओलांडली आहे. राजापूर तालुक्यातील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नेय तसेच अतिवृष्टीमुळेआपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये यासाठी उद्या 22 जुलै रोजी शाळांना सुट्टीजाहीर करण्यात आली आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक…
अपघात
चिपळूण : पूरानंतर चिपळूणात मगरींचे संकट
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार २४ जुलैपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या …
रायगडातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली
आजची पहाट अत्यंत दुखद बातमीनं झालीये. रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इरसालवाडीवर काल रात्रीउशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ घटनास्थळी दाखल होत आहेत. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 दरम्यान, घटनास्थळी जात असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, घटनास्थळी पोहोण्यासाठी मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर असलेलं धुकं बाधा ठरतंय. तसेच पावसामुळे डोंगराचा रस्ताअत्यंत निसरडा झाल्यामुळं बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. सध्या 80 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून 5 जणांचा यादुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अद्याप 100 जण बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेघटनास्थळी दाखल झाले आहेत. रायगडातील (Raigad) (Irsalvadi) घडलेल्या दुर्घटनेचा उपमुख्यमंत्री अजितपवार यांनी नियंत्रण कक्षातून आढावा घेतला आहे. हेलकॉप्टर तयार आहे, पण खराब वातावरणामुळे तिथे ते उतरु किंवा थांबू शकतनाही. त्यामुळे हाताने बचावकार्य करण्याशिवाय पर्याय नाही, असं अजित पवार म्हणाले. तसेच मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना पाचलाखांची मदत जाहीर केल्याचं मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे. तर जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च हासरकार करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. यामध्ये संपूर्ण कामाला लागली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारयांनी दिली आहे. आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये 80 जणांना वाचवण्यात यश आल्याचं देखील त्यांनी सांगितलंआहे. आहे. हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंआहे. पनवेल, रायगडमधील प्रशासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचीमाहिती त्यांनी यावेळी दिली आहे. तसचे मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली असल्याचं त्यांनी सांगितलंआहे. हवामान खराब असल्यामुळे हेलिकॉप्टरचा वापर सध्या तरी बचाव कार्यासाठी करता येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बचावकार्यासाठी लागणारं सामान घेऊन जवळपास 500 ते 700 माणसं घटनास्थळी पोहोचली असून अजून माणसं पाठवणारअसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी,…
रायगड: पाबळ येथे सख्ख्या भावांचा नदीत बुडून मृत्यू
पेण तालुक्यातील बरडावाडी पाबळ येथील निगडा नदीत पोहताना दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाला. ही…
दापोली : आडे येथून 24 वर्षीय तरुणी बेपत्ता
तालुक्यामधील आडे गुहागर आळी दापोली येथून मयुरी जाधव ही २४ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना…
खेड : पावसाचा जोर वाढला, जगबुडी पुन्हा इशारा पातळीवर
जिल्ह्यात काल, गुरुवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 दरम्यान, खेडमधील जगबुडी…
राजापुर : झाड कोसळून 1 ठार, 3 मच्छी विक्रेत्या महिला जखमी
राजापुरातील आठवडा बाजारात अचानक गुलमोहराचे झाड कोसळून एकजण जागीच ठार झाला. तर तीन मच्छी विक्रेत्या…
चिपळूण : फुटबॉल खेळायला जातो, असं घरी सांगून गेले माञ परतलेच नाहीत
कुंभार्ली येथील नदीत चिंब भिजण्यासाठी गेलेल्या 8 विद्यार्थ्यांपैकी दोघेजण बेपत्ता झाले होते. त्या दोघांचे मृतदेह शिरगाव येथीलवाशिष्ठी नदीत सापडले आहेत. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 तब्बल 24 तासांनंतर मृतदेह शोधण्यात यश आले आहे.रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारासकुंभार्ली येथे वाशिष्ठीच्या डोहात ही दुर्घटना घडली. सहा मुलांनी भिजल्यानंतर काही वेळात पाऊस आल्याने जवळच्या छपराखालीआसरा घेतला. मात्र, कादिर लसणे व आतिक बेबल हे दोघे याच ठिकाणी डोहात थांबले. मात्र, काही वेळाने वरच्या बाजूला जोरातपाऊस झाल्याने मोठे पाणी आले. यावेळी हे दोघे पाण्यात बुडाले. वाचवा–वाचवा म्हणून आरडाओरड झाल्यानंतर जवळच थांबलेलीती सहा मुले धावली. मात्र, तोपर्यंत हे दोघे पाण्यात बेपत्ता झाले होते. या घटनेचे वृत्त चिपळुणात समजताच अनेकांनी कुंभार्लीकडेधाव घेतली. पोलिसांनी शोधकार्य सुरू केले. रात्री उशिरा पाऊस व अंधारामुळे शोधकार्य राबविणे शक्य झाले नाही. सकाळच्यावेळी महाड येथून प्रशांत साळुंखे यांच्या रेस्क्यू टीमकडून शोधकार्य सुरू करण्यात आले. यानंतर जयगड येथून कोस्टगार्डची टीमहीदुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कुंभार्ली येथे दाखल झाली आणि त्यांनीही ऑक्सीजन व कॅमेरे लावून डोहात उतरून शोधकार्य सुरूकेले. मात्र, उशिरापर्यंत डोहामध्ये मृतदेह सापडत नव्हते. या टीमने खूप प्रयत्न केले. घळीमध्ये बांबू टाकून देखील पाहण्यात आले. मात्र, मृतदेह सापडले नाहीत. यानंतर पुन्हा एकदा नदीपात्रालगत शोध मोहीम राबविण्यात आली. सायंकाळी 4 वाजण्याच्यादरम्यान यातील एका विद्यार्थ्याचा मृतदेह शिरगाव येथील वाशिष्ठी नदीत आढळला. त्यानंतर दुसर्याचा शोध सुरू झाला आणि5:30 वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथील नदीतच पात्राच्या किनार्यावर दुसर्या मुलाचा मृतदेह आढळला. यानंतर हे शोधकार्यथांबले. दोन्ही मृतदेह शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. त्यानंतर हे मृतदेह पालकांच्याताब्यात देण्यात येणार आहेत. शाळेला सुट्टी असल्याने मिरजोळी येथील नॅशनल इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये शिकणारे इयत्ता दहावीतील आठ विद्यार्थी नदीत चिंबभिजण्यासाठी गेले होते. मात्र, घरामध्ये त्यांनी आपण फूटबॉल खेळायला जातो असे सांगितले होते. यामध्ये इब्राहिम काजोरकर(गोवळकोट), अब्रार हुसेन आंचरेकर (गोवळकोट), फरहान हिदायत पिलपिले (खाटीक आळी चिपळूण), अली नियाज सनगे (रा. बेबल मोहल्ला), जहिद हनीफ खान (रा. कोंढे चिपळूण), आरमान अजीज खान (रा. भेंडीनाका चिपळूण), आतीक इरफान बेबल(रा. बेबल मोहल्ला, अब्दुल कादीर नौशाद लसणे (रा. जिव्हाळा सुपर बाझार) हे विद्यार्थी भिजण्यासाठी नदीवर गेले होते. मात्र, त्यातील दोघेजण बुडाल्याने चिपळूण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. येथील चिपळुण तालुका मुस्लीम संघटनेचे अध्यक्ष नाझीमअफवारे, शाहनवाज शाह तसेच शिरगाव व चिपळूण पोलिस यांनी घटनास्थळी शोधकार्य सुरू केले. सोमवारी (दि.10) सकाळीजेसीबी पाठवून डोहाकडे येणारे नदीचे पाणी तीन बांध घालून वळविण्यात आले. तसेच डोहामध्ये साचलेले पाणी बाहेरकाढण्यासाठी प्रवाह निर्माण करण्यात आला. त्याआधी महाड येथील रेस्क्यू टीम, काही स्थानिक ग्रामस्थ यांनी शोधण्याचा प्रयत्नकेला. मात्र, हाताला काही लागले नाही. …
चिपळूण : वाचवा-वाचवा म्हणून आरडाओरड झाल्यानंतर, 70 वर्षीय पट्टीचे पोहणारे जयराज थरवळ यांनी कसलाही विचार नकरता या डोहात उडी घेतली
वाचवा–वाचवा म्हणून आरडाओरड झाल्यानंतर जवळच थांबलेली ती सहा मुले धावली. मात्र, तोपर्यंत हे दोघे पाण्यात बेपत्ता झाले होते. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 या घटनेचे वृत्त चिपळुणात समजताच अनेकांनी कुंभार्लीकडे धाव घेतली. माञ ही सर्व माणसं येईपर्यंत तिथेच जवळ असलेल्या जयराज थरवळ यांनी हा आवाज ऐकताच त्यांचा शोध घेण्यासाठी सत्तर वर्षीय पट्टीचे पोहणारे जयराज थरवळ यांनी कसलाहीविचार न करता या डोहात उडी घेतली. त्यांनी अनेकवेळा या ठिकाणी उडी घेऊन अनेकांना वाचविल्याचे सांगितले जाते. मात्र, वयोमानानुसार त्यांनाही दमछाक झाल्याने ते बाहेर आले. यानंतर त्यांचा मुलगा गणेश थरवळ यानेदेखील डोहात उडी मारूनशोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. माञ पाण्याचा वेग जास्त असल्याने दोघांनाही ही मुलं सापडली नाहीत. कुंभार्ली येथील हा डोह प्रसिद्ध आहे. स्थानिक म्हणजेच अलोरे, शिरगाव, पोफळी, कुंभार्ली आदी गावातील मुले या ठिकाणी पोहतअसतात. मात्र, स्थानिकांना येथील पाण्याचा अंदाज असतो. चिपळुणातून पोहण्यासाठी गेलेल्या या दहावीतील विद्यार्थ्यांनापाण्याचा अंदाज आला नाही. त्यात दोघे बुडाले. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक…
चिपळुण : दुचाकी अपघातात सख्ख्या भावांचा मृत्यू
चिपळूणमध्ये कामानिमित्त दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन सख्ख्या भावांचा शनिवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास उमरोली-गायकरवाडी येथे झालेल्या…
No More Posts Available.
No more pages to load.