रत्नागिरी तालुक्यातील टिके भातडेवाडी येथे ४१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सततचे आजारपण आणि दारूच्या व्यसनामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मयत मंगेश तुकाराम कांबळे (वय ४१, रा. टिके भातडेवाडी, ता. जि. रत्नागिरी) हे काही काळापासून आजारपणामुळे त्रस्त होते. त्याचबरोबर त्यांना दारूचे व्यसन असल्याचेही समोर आले आहे. दि. २१ एप्रिल रोजी रात्री ९ वाजल्यापासून ते दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान त्यांनी आपल्या राहत्या घरी कोणाच्याही नकळत गळफास घेत आत्महत्या केली.
सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली. प्राथमिक तपासात आजारपण आणि व्यसनामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














