दापोली : “आमचं कुटुंब एक दिवशी रक्ताच्या थारोळ्यात असेल” मृणाली थोरेंना न्याय कधी, अमोल थोरेची चौकशी कधी होणार?

banner 468x60

सर्वसामान्य माणसाला जीवन जगताना असंख्य अडचणींना सामोरं जावं लागतं. कधी व्यवस्थेविरोधात तर कधी प्रशासनाच्या विरोधात लढावं लागतं.

सर्वसामान्य नागरिकांसमोर तीन आशेची किरणं असतात, न्यायालय, पोलीस आणि प्रशासन, आपल्या हक्काची लढाई लढताना वेळोवेळी न्याय मागण्यासाठी फिरावं लागतं मात्र प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळतो असं नाहीय.

सर्वसामान्य जनतेचे शोषण हा मूळ हेतू बदलला नाही. शोषणाच्या या व्यवस्थेतील अनेक पैलू विविध मार्गाने समोर येत असतात आणि यामध्ये भरडला जातो तो फक्त आणि फक्त गरीब माणूस.

kokan katta live

https://youtube.com/@kokankattalive3128?si=iujU8trq4BT4__gb

याचा प्रत्यय दापोली तालुक्यातील टाळसुरे तेलीवाडी येथे आलाय. ही घटना गुरुवारी 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता घडली. दापोली तालुक्यातील टाळसुरे-तेलीवाडी येथे राहणाऱ्या मिलिंद थोरे आणि मृणाली थोरे यांच्यावर कोयत्याने हल्ला झाला.

हा हल्ला आरोपी अमोल थोरे याने केलाय. त्याच्या विरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यानं या कुटूंबियांची सर्व प्रश्न सुटलीत असं नाहीय. आजही हे कुटुंब या घटनेमधून सावरले नाहीत.

आम्हाला न्याय कधी मिळणार असा सवाल त्यांच्या डोळ्यांमध्ये आजही दिसून येतो.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

“ मी माझं सर्वस्व गमावले आहे. आजची पहिली घटना नसून याआधी देखील आमच्यावर या व्यक्तीने हल्ला केलाय आम्ही वेळोवेळी तक्रार केलीय मात्र आम्ह्यला अजूनही न्याय मिळाला नाहीय.”

“ न्याय मागता मागता आमचं कुटुंब एक दिवशी रक्ताच्या थारोळ्यात असेल तेव्हा हे पोलीस आम्ह्यला न्याय देतील का”

असा सवाल मृणाली थोरे यांनी केलाय, साहेब आम्हाला न्याय मिळेल का? असा प्रश्न कोकण कट्टा लाईव्हशी बोलताना त्यांनी उपस्थित केला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे

अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत असून आणखी किती दिवस आम्हाला न्यायासाठी वाट पहावी लागेल’ अशी भावना त्यांनी कोकण कट्टा लाईव्हशी बोलताना व्यक्त केलीय.

अमोल थोरेच्या विरोधात मृणाली थोरेंनी दापोली पोलिसात तक्रार दिली आहे. हे सर्व एकमेकांचे नातेवाईक असून त्यांच्या जमिनीवरुन वाद सुरू आहेत.

दिलेल्या तक्रारीनुसार,हे सर्व एकमेकांचे नातेवाईक असून त्यांच्या जमिनीवरुन वाद सुरु आहेत. गुरुवारी टाळसुरे-तेलीवाडी येथील ग्रामस्थ वाडीतील रस्याच्या दुतर्फा असलेली झाडी तोडत होतो. तेव्हा अमोर थोरे याने ठेवलेल्या त्याच्या सेंट्रिंगच्या लाकडांवर वाडीतील ग्रामस्थांनी तोडलेल्या झाडांच्या फांद्या पाहून त्या फांद्या मिलिंद थोरे यानेच टाकल्याचा अमोलचा समज झाला.

या रागातूनच मिलिंद थोरे आणि त्यांच्या पत्नी मृणाली थोरे यांनी तयार केलेली आंबा कलम अमोल थोरेने कोयतीने तोडून नुकसान करु लागला.

मिलिंद थोरे आणि त्यांची पत्नी अमोलला थांबवण्यासाठी गेले असता अमोलने तिथे काम करत असलेल्या एक व्यक्तीकडून कोयती घेऊन मिलिंदच्या डोक्यात अमोलने दोन वार केले आणि मिलींद यांना दगडावर आपटलं आणि त्याच्या पत्नीच्या उजव्या हाताच्या बोटावर कोयतीने वार केले.

हे सर्व बघून मृणाली या बेशुद्ध अवस्थेत पडले आणि हे सर्व प्रकरण दापोली पोलिसात गेलं अमोल थोरे विरोधात भादंवि कायदा कलम 324,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल थोरे हा जामिनावर बाहेर आहे. मात्र हे प्रकरण एवढ्या पुरतं मर्यादित नाहीय याआधी देखील 2021 ला मिलिंद थोरे यांच्या कुटुंबावर हल्ला झाला.

यावेळी लाथाबुक्यांनी अमोल थोरेनी त्यांना मारहाण केली. आता अमोल थोरेने कोयतीने वार केलेत नंतर आम्ह्यला हा ठार मारेल असं मृणाली थोरे यांचं म्हणणं आहे.

“अजूनही जीवाला आमच्या धोका आहे हा व्यक्ती दुसऱ्याच दिवशी जामिनावर सुटला. आम्ही अमोल थोरे विरोधात पाचवेळा NC केलीय मात्र हा त्रास काही कमी झाला नाहीय. आम्ही याचा जाब विचारण्यासाठी दापोली पोलिसात गेलो मात्र तिथले पोलीस प्रकाश मोरे यांनीच आम्ह्यला म्हटलं की आवाज केलात तर तुमच्यावरच NC करू असं म्हटलं आम्ह्यला जी वरून रिपोर्ट आलेत तेच रिपोर्ट बघून कलम लावली आहेत असं सांगितलं.”

“ जर पोलिसच असं करत असतील तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा “

असं मृणाली थोरे यांचा प्रश्न आहे.

“जर पाचवेळा आम्ही तक्रार करतोय तर पोलीस एवढी साधी कलम का लावतात. दापोली पोलिसांनी योग्यरीत्या पंचनामा केला नाही”

असं मृणाली थोरेंच म्हणणं आहे. पोलिसांनी तपास कोणत्या पद्धतीने केला आहे असा प्रश्न आमचा आहे.

“न्याय मिळाला नाही तर दापोली पोलिसांसमोर जाळून घेईन”असा इशारा मृणाली थोरे यांनी दापोली पोलिसांना दिला आहे.

अमोल थोरे याच्यावर 307 गुन्हा दाखल होत नाहीय तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका मृणाली थोरेंची आहे.

आम्ही यासंदर्भात दापोली पोलीस स्टेशनचे प्रमुख आहिरे यांच्याजवळ संपर्क केला असता

“आम्ह्यला जी मेडिकल रिपोर्ट आले आहेत त्यानुसार ही कलमं लावण्यात आली आहेत”

अशी प्रतिक्रिया आहिरे यांनी दिली. मात्र थोरे यांच्या

“कुटुंबीयांचं म्हणणं आहे की एवढा हल्ला होऊन देखील जामीन मिळणारी कलमं दापोली पोलिसांनी का लावलीत आणि पोलीस एवढं होऊन देखील कोणाला पाठीशी घालतात”

असा प्रश्न थोरेंचा आहे.

या व्यक्तीपासून आमच्या जीवाला धोका आहे असं मिलिंद थोरे यांनी म्हटलं पोलिसांनी योग्य दखल घेतली नाही तर कधी आमच्यावर हल्ला होऊ शकतो अशी भीती थोरेंनी व्यक्त केली आहे.

शोषण करणाऱ्या यंत्रणा कायम गरिबांच्या भावनांशी, स्वप्नांशी खेळ करण्यासाठी सज्ज आहे का असा प्रश्न या प्रकरणानंतर उपस्थित झाला आहे. या सर्व प्रकरणाचा पाठपूरावा कोकण कट्टा लाईव्ह करत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *