दापोली : पाण्याचा ना एक थेंब, पट्टी भरायचा नेम, दापोली नगरपंचायतचा फलक चर्चेत

banner 468x60

दापोलीकरांवर पाणी टंचाईचे सावट असून एकीकडे काटेकोर नियोजन तर दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याच्या घटना समोर येत आहेत.

banner 728x90

एकीकडे अनियमित येणारं पाणी आणि दुसरीकडे मात्र दापोली नगरपंचयातने आपले नळ कनेक्शन तोडणे अपेक्षित आहे का ?


हा कटू प्रसंग टाळण्यासाठी नगरपंचायतीचे थकित व चालू
घरपट्टी, नळपट्टी, गाळाभाडे ताबडतोब भरा. अश्या आशयाचं फलक सध्या दापोलीत चर्चेत आहे, दापोलीतील अनेक समस्या दापोली नगरपंचायतने सुधाराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नियम लावा पण सुविधा पण द्या अशी मागणी दापोलीकरांनी केली आहे. दापोलीच्या नागरिकांना पिण्यासाठी पाणी वेळेत सोडून नगरपंचायतने सहकार्य करावे अशी दापोलीच्या नागरिकांची मागणी आहे. दापोली शहराला नारगोली व कोडजाई येथील नळपाणी योजनेतून दिवसाला सुमारे 20 लाख लिटर पाणीपुरवठा केला जात असून वाढत्या तापमानामुळे या साठयात दिवसेंदिवस घट होऊ लागली असून यामुळे दापोलीकरांवर पाणी कपातीचे संकट घोंगावू लागले आहे.

तर दुसरीकडे काळकाई कोंड व उसी पार्क येथे पाईपलाईनमधून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याची बाब समोर आली आहे. दापोली शहराला कोडजाई व नारगोली येथे असलेल्या नळपाणी योजनेतून आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा केला जातो.

एप्रिल महिन्याच्या मध्यावर कोडजाईतील पाणीपुरवठा ठप्प होतो. व त्यानंतर नारगोली येथील योजनेवर दापोलीकरांना भरवसा ठेवावा लागतो. दापोलीकरांना दिवसाला 20 लाख लिटर पाण्याची गरज आहे. सध्या दापोलीमध्ये 2 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून एप्रिल महिन्याच्या 15 तारखेनंतर त्यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे.

तर मे महिन्यात पाण्याच्या साठयाचा अंदाज घेऊन पाणीपुरवठा करावा लागतो.
दापोलीपासून सुमारे 15 किमी अंतरावर असलेल्या सोंडेघर येथील धरणातून 99 कोटी रूपये खर्च करून नवी नळपाणी योजना आणण्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नियोजन केले असून काही दिवसांपूर्वा दापोलीत झालेल्या कार्यक्रमात ही नळपाणी योजना पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

यासाठी दापोली नगरपंचायतीमधून पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. सुमारे 15 दिवसात या कामाचे भूमीपूजन होण्याची शक्यता असून दापोली करांना पुढील वर्षभरात सोंडेघर येथून पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता आहे.


दरम्यान एकीकडे शहरात टंचाई असताना दुसरीकडे काळकाई कोंड येथील पाण्याच्या टाकी बाहेरील मुख्य मार्गात नजीक पाईपलाईनमधून दिवसाला लाखो लिटर पाणी वाया जातोय उसी पार्क येथेही अशीच परिस्थिती आहे.

त्यामुळे पाण्याचे नियोजन करताना नगरपंचायत प्रशासनाने पाणी वाया जाऊ नये यासाठी तत्पर राहण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *