Breaking News
रत्नागिरी : बँकेच्या ताब्यातील सीलबंद फ्लॅटचे कुलूप तोडून बेकायदेशीर ताबा, दाम्पत्याविरुद्ध गुन्हा चिपळूण : लोटे एमआयडीसीतील प्रदूषण पुन्हा ऐरणीवर; सोनगावात पिवळे रसायनमिश्रित पाणी सोडल्याचा आरोप, ग्रामस्थ, मच्छीमार संतप्त चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाची विभा अरविंद ग्रंथालयाला सदिच्छा भेट, वाचन चळवळ बळकट करण्याचा निर्धार दापोली : भाटघरमध्ये शेतकरी जागृती; ‘उपयुक्त किडी’ जपा, रासायनिक फवारणी टाळा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ‘कृषीकन्या’ गटाचा पुढाकार मंडणगडमध्ये बेपत्ता व्यक्तीचा जंगलात सांगाडा, गळफासासाठी वापरलेला फासही आढळला 2 महिन्यांनंतर उलगडले गूढ

खेड : थकित पाणीपट्टीचे पैसे मागायला गेलेल्या महिलेला भाडेकरुंची मारहाण

banner 468x60

भाडेकरूकडे थकित पाणीपट्टीचे पैसे मागायला गेलेल्या मालकिणीला 3 भाडेकरूनी मारहाण केल्याची घटना एम.आय.बी. हायस्कूलजवळ 22 रोजी सकाळी 11 वाजता घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

तन्मय सुदेश खेडेकर (६९), सार्थक सुदेश खेडेकर व एक महीला (सर्व रा. रोहीदासनगर ता. खेड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला भाडेकरु जन्नत पेडेकर यांचेकडे थकित पाणीपट्टीचे पैसे मागण्याकरिता गेली होती. तेव्हा जन्नत हा फिर्यादी यांना कोणाची पाणीपट्टी मागायला आलीस? नळ तोडतेस का? असे बोलून शिवीगाळ करु लागला व तु ईथे आलीस तर तुला ठार मारुन टाकिन अशी धमकी दिली.

तसेच लाकडी दांडक्याने उजव्या हाताच्या मनगटावर फटका मारला. त्यानंतर फिर्यादी घरात आरोपीत घुसले व तिला तुमचा आज निकाल लावतो. अशी जिवे मारण्याची धमकी दिली. टी.व्ही फोडुन घराची नासधूस करुन १५,०००/- रुपयेचे नुकसान केले. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *